सर्व किराणा दुकाने सकाळी चालू राहणार                                                                 -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

उस्मानाबाद, दि.7 (जिमाका) :- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू (को‍व्हिड 19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीतच चालु ठेवण्यात यावीत,असे आदेश  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.


उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा

या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, उस्मानाबाद, पोलीस उपअधिक्षक (गृह) उस्मानाबाद, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपंचायत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

4 comments

Jivan Dolare said...

बर केले मॅडम नाहीतर किराणा भाजी पाला मेडीकल याच कारण सांगून लोक रोडवर फिरतात किराणा वाले तर भाव जास्त दराने विकत होते

Jivan Dolare said...

किराणा वाले जास्त दराने माल विकत आहेत

Unknown said...

Hoy kirana khup mahag vikat aahet tyanchi dakhal Ghetli pahije

Unknown said...

अपंगपेन्शन. लवकर.करावी