शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता धान्य घेऊन जाण्याचे आवाहन

 

 शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता धान्य घेऊन जाण्याचे आवाहन

उस्मानाबाद  :-  कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे धान्य एकत्रितपणे मिळणार असल्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाने नव्याने दिलेल्या निर्देशानुसार एप्रिल मे जून चे धान्य त्या त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहे. 
सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना  आणि एपीएल शेतकरी योजनांच्या लाभार्थ्यांनी आज पासून एप्रिल महिन्याचे धान्य साठा पॉस मशीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी 35 किलो धान्य ( 23 किलो गहू आणि 12 किलो तांदुळ) दोन रुपये प्रति किलो प्रमाणे गहू आणि तांदळाचा दर 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे मिळणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी धान्य प्रतिव्यक्ती 3 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ 2  किलो 3 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे व एपीएल शेतकरी योजना मधील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती  3 किलो गहू 2 रुपये प्रति किलेा
दराने आणि तांदूळ 2 किलो 3 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. तसेच फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साखर 1 किलो 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.
तसेच, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी) अतिरिक्त 5 किलो तांदूळ प्रती व्यक्ती प्रती महिना शासनाने दि.31 मार्च 2020 च्या शासन निर्णया नुसार जिल्हयास मंजूर केले आहे. हे अतिरिक्त धान्य लाभार्थ्याना मोफत मिळणार आहे. त्याचा डेटा अजून पॉस मशीन वर उपलब्ध झालेला नाही. तो डेटा व धान्य लवकरच उपलब्ध झाल्यानंतर याच महिन्यात वाटप करण्यात येईल. तोपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे आपले आपले धान्य आपल्या स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

From around the web