Header Ads

शेत मजुराची आत्महत्या, मालकावर गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, मुरुम: गजेंद्र गुंडा भिसे वय 55 वर्षे, रा. फणेपुर, ता. लोहारा हे सचिन सुधाकर पाटील, सुधाकर पाटील दोघे रा. चिंचोली (भुयार), ता. उमरगा यांच्या चिंचोली (भु.) येथील शेतात सालगडी म्हणुन नोकरीस होते. नोकरीचे वर्ष संपल्याने हिशोब करुन गजेंद्र भिसे याला दिलेल्या रकमेतील 50,000/- रु. आम्हास परत दिल्या शिवाय शेतातील कामावरुन निघुन जायचे नाही. असा दबाव सचिन पाटील व सुधाकर पाटील या दोघांनी गजेंद्र भिसे यांच्यावर टाकून त्यांना वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासास कंटाळून गजेंद्र भिसे यांनी दि. 31.03.2020 रोजी 09.00 वा. सु. विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या रुक्मीणी गजेंद्र भिसे (मयताची पत्नी) यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments