सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घट

 
सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घट

मुंबई, जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. त्यामुळे आर्थिक विकासाची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतींत घसरण सुरूच राहण्यावर झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक श्री प्रथमेश माल्ल्या यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक सुधारणांच्या आशा निर्माण झाल्या तर स्पॉट गोल्डच्या किंमती मंगळवारी ०.८ टक्के घसरणीसह १६४८.५ डॉलरवर बंद झाल्या. याच वेळी व्हायरसवर मात करण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि इतर प्रमुख केंद्रीय बँकांनी मदतीसाठी उपाययोजना केल्याने बुलियन धातूच्या घसरणीवरही मर्यादा आल्या. यूरोझोन आणि जपानने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रत्येकीसाठी अर्धा ट्रिलियन यूरोच्या स्टिमुलस पॅकेजची घोषणा केली आहे.
डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत ९ टक्के घसरण होऊन त्या २३.६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाचे प्रमुख उत्पादक राष्ट्रांसाठीची उत्पादन कपात आणि मागणीची चिंता अजून सुटलेली नाही. बाजारात चढ-उतारामुळे तसेच उत्पादन कपातीच्या शक्यतांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत.
स्पॉट गोल्डच्या किंमतीत घसरण झाल्याचा चांदीच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम झाला. मंगळवारी स्पॉट सिल्व्हरचा भाव ०.१२ टक्के वाढून १५.० डॉलर प्रति औसांवर तो बंद झाला.

From around the web