महाभयंकर : अमेरिकेत 24 तासांत २००० पेक्षा जास्त मृत्यू

 
महाभयंकर : अमेरिकेत 24 तासांत २००० पेक्षा जास्त मृत्यू

 वॉशिंग्टन - अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे २००० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या  मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2108 लोकांचा मृत्यू  कोरोना विषाणूमुळे झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अशी भीती व्यक्त केली आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांच्या देशात 1 ते 2 लाख लोक मारले जाऊ शकतात.

जगातील कोरोना विषाणूमुळे होहोणाऱ्या  मृत्यूची संख्या 100,000 ओलांडली आहे. मृतांचा आकडा  लाख एक हजार 576 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 16.77 लाख लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या साथीच्या आजाराने संक्रमित 3..7 लाखाहून अधिक लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतातही कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण ६ हजारच्या पुढे गेले आहे.

From around the web