ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, कोरोना विषाणूंवर सांगितले जालीम औषध ...

 

ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, कोरोना विषाणूंवर सांगितले जालीम औषध ...


कोरोनाच्या भयानक संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने मागणी केलेले अँटी-मलेरिया औषध म्हणजे हायड्रोक्सीक्लोरोक्विन भारतातून निर्यात करण्याची विनंती केली आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे मागील महिन्यात औषधांच्या निर्यातीवर भारताने पूर्णपणे बंदी घातलेली होती. ट्रम्प म्हणाले की त्यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलणी करून अमेरिकेसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध निर्यात करायची विनंती केली.

ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये आपल्या दैनंदिन समाचार परिषदेत सांगितले की, मी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. भारतात मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधे तयार करतात आणि भारत अमेरिकेला हे औषध देण्यावर गांभीर्याने विचार करीत आहे.

विशेष म्हणजे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 25 मार्च रोजी हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली परंतु ते म्हणाले की मानवतेच्या दृष्टीकोनातून काही शिपमेंटला विशेष आधारावर परवानगी दिली जाऊ शकते.

मलेरियाविरोधी औषधांचे चांगले निकाल -  ट्रम्प

यापूर्वी दिलेल्या निवेदनात ट्रम्प म्हणाले की मलेरियाच्या उपचारात अनेक दशके वापरली जाणारी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्येही चांगले परिणाम देत आहे.
ते म्हणाले , "आम्ही कोरोना व्हायरसच्या उपचार आणि प्रतिबंधात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि इतर उपचारांच्या परिणामाचा सतत अभ्यास करीत आहोत आणि त्याच्या निकालांविषयी संपूर्ण माहिती देऊ." तथापिव्हाइट हाऊस टास्क फोर्सच्या वरिष्ठ सदस्याने अद्याप एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाही. यासंदर्भात चाचण्या, प्रयोग हे अजूनही सुरू असल्याने त्याबाबत काही समजल्यास नंतर माहीती देऊ असे स्पष्ट केले.

From around the web