सावधान : सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकाल तर होईल शिक्षा !

 

सावधान : सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकाल तर होईल शिक्षा !


मुंबई  - एकीकडे शासन, प्रशासन कोरोना विषाणूशी सामना करीत असताना , दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे.खोटे आणि बनावट मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत.  त्याविरुद्ध राज्याच्या गृह विभागाने कडक पाऊल उचलले आहे.

 करोनासंबंधी येणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर सर्रासपणे शेअर, फॉरवर्ड होत असताता.तुम्हीदेखील असे मेसेज शेअर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे कारण सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकल्यास जेलमध्ये जावं लागू शकतं. मुंबई पोलिसांनी यासंबंधी पत्रक जारी केलं आहे.

काय केल्याने होऊ शकते शिक्षा -

१) व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेली माहिती खोटी किंवा तथ्याशी छेडछाड करणारी असल्यास कारवाई होऊ शकते.

२) एखाद्या समाजाविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्यास

३) सामान्यांमध्ये भीती तसंच गोंधळ निर्माण केल्यास

४) सरकारकडून करोनासंबंधित घेतलेल्या निर्णयांवर तसंच प्रशासनावर अविश्वास दाखवत जीवाला धोका निर्माण करणे तसंच गोंधळाचा परिस्थिती निर्माण करणे.

From around the web