Header Ads

पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ द्यावी - चंद्रकांतदादा पाटील

५ एप्रिल रोजी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपली एकजूट पुन्हा दाखवावी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ५ एप्रिल रोजी सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपली एकजूट दाखवावीआणि रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईट नऊ मिनिटांसाठी बंद ठेवावेतआणि दिव्याच्या प्रकाशात भारतमातेचे स्मरण करावेअसे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष . आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले कीदेशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांमध्ये एकटेपणाचीनैराश्येची भावना निर्माण झाली. या अंधकारमय वातावरणातून सर्वांना बाहेर काढूनत्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी दि. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्वांनी आपापल्या घरातील लाईट नऊ मिनिटांसाठी बंद करावेतआणि मेणबत्तीमोबाईलचा फ्लॅश लाईटटॉर्चच्या प्रकाशात घराच्या बाल्कनीतमोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करावे. यावेळी कुणीही रस्त्यावर येऊन गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे.

ते पुढे म्हणाले कीकोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण देशाने एकजुटीचा प्रत्यय जगाला दाखवून दिलेला आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवल्यास आपण कोरोनावर नक्कीच मात करुअसा विश्वास ही  पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments