Header Ads

राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या ११३५, महाराष्ट्र अद्याप स्टेज ३ मध्ये नाही-राजेश टोपे


राज्यात कोरोना विषाणूचा  संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला. आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे,  अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मास्क वापरणं सक्तीचं असून मास्कशिवाय फिरणं अत्यंत धोक्याचं आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कायद्याचा वापर करून मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , असेही टोपे यांनी सांगितले. 

 मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल उभे करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात करोनाबाधितांचा मृत्यूदर ६ टक्के आहे. हा दर सरासरीपेक्षा जास्त आहे असंही ते म्हणाले. धारावीत रुग्णसंख्या वाढली आहे त्यामुळे धारावी सील करण्याचा विचार आहे का? असं विचारलं असता तूर्तास असा काही विचार करण्यात आलेला नाही मात्र धारावीत लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, पुण्यात आज पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला. मागील मागील 24 तासात शहरात आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. अद्याप राज्यात तिसऱ्या स्टेजचा संसर्ग सुरु झाली नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत आहे. मागील आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या वर केलीय. त्याखालोखाल पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई आणि पुणे शहरात काही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग आता सील करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अशी ठिकाणं आता प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.
Posted by Osmanabad Live on Wednesday, April 8, 2020

No comments