भाजपाला कोरोनाविरोधी कामाचा सल्ला देण्यापूर्वी स्वतःच्या नेत्यांना द्या

 
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे जयंत पाटील यांना प्रत्युत्तर

भाजपाला कोरोनाविरोधी कामाचा सल्ला देण्यापूर्वी स्वतःच्या नेत्यांना द्या


मुंबई - मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या ठरावाबद्दल घटनात्मक मुद्दा मांडला  म्हणून कोरोनाविरोधी लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देणाऱ्या जयंत पाटील यांनी आधी स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना तसा सल्ला द्यावा कारण त्याची सगळ्यात जास्त गरज त्यांना आहे.’ असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्षचंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला.

कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण मग्न असताना राज्याच्या मंत्रिमंडळाची अचानक बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी घटनात्मक मुद्दे मांडले व अशी शिफारस करण्याच्या आधी कोरोनाविरोधी लढाईवर लक्ष एकाग्र करा असे सुचविले होते. त्या संदर्भात मा. जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. त्याला मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अजून दोन महिने आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे शिफारशीचा हाच ठराव मंत्रिमंडळाने मे महिन्यात केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत काज्या दोन रिक्त जागांचा उल्लेख जयंतराव करत आहेत त्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे पूर्वीच राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीतयाचीही नोंद घ्यावी.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की कोरोनाविरोधातील लढाईत भाजपाचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर मदत कार्य करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. लाखो नागरिकांना शिजवलेले अन्न किंवा शिधा पुरवला जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सुरक्षा कीट वाटले आहेत आणि पुढाकार घेऊन रक्तदान केले आहे. भाजपाचे सर्व नेतेआमदारखासदार आणि सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाविरोधी लढाईवर भर दिला आहे. ह्या सर्व कामात राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहेयाची माहिती जयंतराव पाटील यांनी द्यावी.’

ते म्हणाले की कोरोनाचे राजकारण करणेविरोधकांना आपल्या बंगल्यावर अपहरण करून आणून मारहाण करणेआर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणेआपल्या स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणेअधिकाऱ्यांना वेठीला धरून विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंतराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे.’

From around the web