Header Ads

संसर्गजन्य साथीत इस्लाम 'लॉकडाउन' सुचवतो...

कुराण शरीफ मध्ये काय लिहिले आहे ? कोरोना विषाणू  (कोविड 19 )  च्या जागतिक महामारीच्या काळात इस्लामचा पारंपारिक सल्ला अंमलात आणला असतातर आज देशातील कोरोना संक्रमितांमध्ये एक तृतीयांश लोक तबलीगी जमातचे नसतेच अथवा जमातचे श्रीमंत अमीर मौलाना साद यांना तोंड लपवून पळही काढावा लागला नसता. कारण कुराण  शरीफच्या पाचव्या अध्यायमध्ये  असे स्पष्टपणे सांगितले आहे की, आपण ज्या देशात राहता त्या देशातील कायदे कानून तसेच तेथील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे . नियमांची पायमल्ली कुणीही करू नये,असे लिहिले आहे. 

सरकारी सूचना आणि इस्लामच्या शिकवणीत समानता

आज काही लोक हजरत निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातीच्या झालेल्या चूका उघडकीस आणण्याऐवजी उलट चूकांवर पांघरूण घालण्याच्याच प्रयत्नात आहेतपण कोविड  19  सारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारांना टाळण्यासाठी सरकारच्या सूचना आणि इस्लामच्या शिकवणुकीत समानता आढळणार्‍या काही तथ्यांसह काहीसे सुशिक्षित मुस्लिम पुढे येत आहेत. यापैकी एकमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सय्यद मुजफ्फर हुसेन यांचे म्हणणे आहे की ज्या धर्मातील प्रमुख ग्रंथ आणि त्याचे हुजूर प्रेषित मुस्तफा मुहम्मद सल्लल्लाउउल्लाहिवस्सलम यांनी हजारो वर्षांपूर्वी संसर्गाविरोधात निर्बंध व सावधगिरीचा उल्लेख केलेला होताआज २१ व्या शतकात विज्ञानसुद्धा जे नियम सांगतेय ते अगदी एकसारखेच वाटत आहे.

देशातील लोकांचे रक्षण करा

अशा कोरोनाच्या परिस्थितीत  इस्लामवर विश्वास असणार्‍यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या धर्माद्वारे ठरविलेल्या मार्गाचे अनुसरण करणे आणि स्वतःचेसंपूर्ण देशातील आणि लोकांचे रक्षण करणे आणि सरकारच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणे योग्य आहे. ते म्हणतात की, कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात कोणीतरी सरकारच्या सूचनांचे उल्लंघन केले तर अशी समाज आणि देशाविरूद्ध कृती करणारी व्यक्ती बेजबाबदार मानली जाईल.

दोनदा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य झालेले मुझफ्फर हुसेन हुजूर मुस्तफा  हे मुहम्मद सल्लल्लाउउल्लाहिल्लासल्लाम च्या हदीसात सुरेत सांगितलेला सल्ला उद्धृत करताना म्हणतात की संसर्गजन्य रोगादरम्यान लॉक डाउन सारख्या उपाययोजनांसाठीही हदीस सुचना देते. हदीसात असे म्हटले आहे की संसर्गजन्य रोगाच्या वेळीजेथे महामारी आहे अशा ठिकाणी जाणे टाळा. आणि आपण एकाच शहरात किंवा त्याच ठिकाणी असल्यास तेथेच थांबा आणि ती जागा सोडू नका. अल-बुखारी (5739) आणि अल-मुस्लिम (2219)

आज सरकार 'सामाजिक अंतरआणि 'अलग ठेवणेयाबद्दल बोलत आहे. संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला निरोगी लोकांपासून दूर ठेवण्याची सूचनाही हदीसमध्ये देण्यात आली आहे. अल-बुखारी 6771 आणि अल मुस्लिम 2221

इतकेच नाही तर ज्या व्यक्तीला कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आहे त्याने समाजातील उर्वरित लोकांच्यापासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. [शाही अल-बुखारी खंड 07- 71- 608].

हदीसमध्ये स्पष्ट केलेय जर आपण संसर्गग्रस्त असाल तर इतरांनाही संकटात टाकू नका

आज  तबलीगी जमातीचे लोक हजरत निजामुद्दीनच्या जागेवरुन देशभर हा आजार पसरवत फिरत आहेत. हदीस स्पष्टपणे सांगते की, जर आपण संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असाल तर इतरांना त्यापर्यंत पोचू नये हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे इतरांना अडचणीत आणू नका. [सुनन इब्न माझा (2340)]

बर्‍याच भागात लोक अद्यापही शासकीय सूचनांचे उल्लंघन करत सामूहिक प्रार्थनेसाठी आग्रह धरत आहेत. तर इस्लामच्या आकाशातील हदीसमध्ये असे म्हटले आहे की अशा साथीच्या रोगात तुमचे घर आपली मशिदी आहे. सवाब (पुण्य) मशिदीतला नमाज कशालाअशा वेळी घरात प्रार्थना वाचायची असते. [अल तिरमझी (अल-सालाह291)].

स्वच्छतेनेच अर्ध्या गोष्टी पूर्ण

मुझफ्फर हुसेन हे [(अबू दाऊदअल तिरमाझीपुस्तक43हदीस 2969) शाही] याचा संदर्भ देताना सांगतात हुजूर मुस्तफा मुहम्मद सल्लल्लाउउल्लाहिल्लासल्लाम हे शिंका किंवा खोकला येत असे तेव्हा स्वतःच्या कपड्यांनी तोंड झाकून घेत असे. तर घरी येताच आपले हात धुवत असे. स्वच्छता ठेवली तर अर्ध्या गोष्टी पूर्ण होतात. इस्लाममधील पाच वेळेला नमाज अदा करणे ही प्रार्थना आहे आणि आणि नमाजच्या आधी स्वच्छ होणे असते.[अल मुस्लिम (223)]

No comments