लॉकडाऊन  कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढणार ?

 
लॉकडाऊन  कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढणार ?

कोरोना   व्हायरसचा उद्रेक अजूनही चालूच आहे. देशासह संपूर्ण जगात कोरोना संक्रमण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे   कोरोनाने अक्षरश  थैमानच घातले आहे . भारतात 2500 हून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडलेले आहेत   तर आत्तापर्यंत 68 लोकांचा मृत्यू कोरोनाच्या कारणानेच झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत  14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.

आता प्रत्येकालाच हा कोरोना विषाणू आणि त्यामुळे झालेला लॉकडाऊन याबद्दल प्रश्न आहे की लॉकडाऊन केव्हा थांबवतील परंतु ज्या प्रकारे हा कोरोना विषाणू पसरत आहे ,  थैमान घालतोय त्यामुळे सर्वांच्याच समस्या वाढलेल्या आहेत. दरम्यान भारतातील लॉकडाऊनच्या विषयी एका संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात लॉकडाऊनचा कालावधी अनेक दिवस असणार आणि तो सप्टेंबरपर्यंत वाढू शकेल.

दरम्यान अमेरिकन सल्लागार कंपनी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) केलेल्या नव्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतात लागू करण्यात आलेला लॉकडाउन सप्टेंबरच्या मध्यापर्यंत वाढवता येऊ शकतो. या अहवालात असे म्हटले आहे की जूनच्या चौथ्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात भारत देशव्यापी लॉकडाउन हटविण्यास सुरुवात करेल.

सदर अभ्यासानुसार, देशातील आरोग्य सेवा क्षेत्रातील तत्परता आणि सार्वजनिक धोरणातील प्रभावीपणाच्या नोंदीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा परिणाम म्हणून ही बंदी हटविण्यात उशीर होऊ शकेल. तसेच अहवालात अशी भीती व्यक्त केली गेली आहे की, जूनच्या तिसर्‍या आठवड्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण अचानक वाढू शकते.

तसेच या रिपोर्ट मध्ये  भारताची वास्तविक स्थिती ती संपूर्ण लॉकडाउन असली किंवा नसली तरी संभाव्य लॉकडाउनची सुरूवात  होण्याची  तारीख संबंधित देशांसाठीच्या महत्त्वाच्या तारखा आणि लॉकडाऊन संपण्याची शेवटची तारिख  यांचा अंदाज बांधलेला आहे . या अहवालात कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या डेटाच्या अंदाजानुसार मॉडेलिंगच्या आधारे 25 मार्चपर्यंतच्या अंदाजानुसार हा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.   भारतात कोरोना संक्रमणाची संख्या वाढतच आहे आणि आणखी प्रकरणे पुढे येत आहेत    ती थांबविणे, लक्ष देणे हे सरकार आणि प्रशासनासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. बर्‍याच अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, एप्रिलच्या मध्यापासून भारतात कोरोनाचा कहर सुरू होईल.

From around the web