Header Ads

लॉकडाउनच्या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ

23 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान तब्बल 69 तक्रारीदेशभरात कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवलेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन भारतात लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे एकीकडे प्रदूषण आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे देशांतर्गत हिंसाचारासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींत दुप्पट वाढल्या आहेतत्यातच केवळ ऑनलाइन तक्रारी येत आहेत.


 राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार 23 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत महिलांकडून घरगुती हिंसाचाराच्या तब्बल 69 तक्रारी आल्या आहेत23 मार्च 2020 ते 1 एप्रिल या कालावधीत महिलांकडून 15 सायबर गुन्ह्यांची नोंदणी झालेली आहे. त्याचबरोबर महिलांशी घरगुती हिंसाचाराच्या 69 तक्रारी आल्या आहेत.

257 तक्रारींमधील 237 केसेसवर कारवाई


बलात्कार किंवा बलात्काराच्या प्रयत्नांची 13 प्रकरणेसन्मानाने जगण्याच्या अधिकाराविषयी 77 तक्रारी महिलांकडून आल्या आहेत. महिलांकडून एकूण 257 तक्रारी दाखल झाल्या असून त्यांपैकी 237 तक्रारींवर कारवाई झालेली आहे.

पतीच्या भीतीने तक्रार करू न शकणाऱ्या महिला


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 'यापेक्षा घरगुती हिंसाचाराची प्रकरणे अधिक आहेतपण पती घरात सतत उपस्थित राहिल्यामुळे महिला तक्रार करण्यास घाबरत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, या महिला पोलिसांशी संपर्क साधू शकत नाहीत कारण त्यांना भीती वाटतेय की, जेव्हा तिचा नवरा पोलिस स्टेशनच्या बाहेर येईल तेव्हा तिला पुन्हा मारहाण होईल आणि लॉकडाऊनमुळे सध्या कोठेही जाऊ शकत नाहीत. पूर्वी महिला आपल्या माहेरी पालकांकडे जात असतपरंतु आता त्या हे करण्यास सक्षम नाहीत.

घरगुती हिंसाचारापासून वाचवण्याची स्त्रियांची मागणी


महिलांना घरगुती हिंसाचारापासून जर वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे त्यंचा बचाव करण्याला मदत करणे हाच आहे. सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या संचालिका रंजना कुमारी म्हणाल्या की लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरीच आहे आणि महिला मदत मिळवण्यास असमर्थ ठरत आहेत.परंतु महिलांसाठी ही योग्य परिस्थिती नाही.

No comments