15 एप्रिलपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होण्याची शक्यता

 
परदेशात जाणाऱ्यांना वाट पहावी लागेल

15 एप्रिलपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होण्याची शक्यता


आठवड्यांपासून रखडलेल्या एअरलाईन्स वाहतुकीसाठी चांगली बातमी आहे. प्रत्यक्षात जर सर्व काही व्यवस्थित झाले आणि 14 एप्रिलनंतर लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली नसेल तरच (लॉकडाऊन विस्ताराची बातमी झपाट्याने पसरत असली तरी कॅबिनेट सचिवांनी त्यास नकार दिला आहे.) 15 एप्रिलपासून देशांतर्गत विमानांची उड्डाणे सुरू करू शकता, असे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे म्हणणे आहे. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या दरम्यान पुरी यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या प्रश्नावर पुरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बाबतीत वेगळ्या आधारांनुसार निर्णय घेतला जातो. म्हणजेच कोणत्या फ्लाइट कोठे जात आहे आणि त्यामध्ये  किती लोक प्रवास करणार आहेत त्यानुसार फ्लाइटला उड्डाण करण्याची मंजुरी मिळते. परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्याविषयी अंतिम निर्णय हा गृह व आरोग्य मंत्रालय घेत असते.  अन्य देशांमध्येही कोरोनाच्या साथीच्या आजाराचा परिणाम कमी होत असेल तरच भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करावयाची आहेत कारण जर तसे झाले नाही तर उड्डाणे घेणे म्हणजे आजारपणास आमंत्रण देण्यासारखेच होईल.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत  स्पष्टीकरण नाही

त्याचवेळी लॉकडाऊन वाढविण्याबाबत हरदीप पुरी यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, इतर सर्व देशांमध्ये लॉकडाउन कालावधी एक ते दोन वेळा वाढविण्यात आलेला आहे. आत्ता असे सांगितले जात आहे की अमेरिकेने लॉकडाऊन मे पर्यंत वाढवला आहे. म्हणजेच मे पर्यंत तेथील लोक घराबाहेर पडू शकत नाहीत हे निश्चित.

कोरोनाचा सर्वाधिक फटका विमान उद्योग    एअरलाईन्सना बसलाय तसेही कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच रखडली आहे परंतु विमान कंपनीला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंदाजानुसार 21 दिवसांत विमान कंपन्यांचे 70ते 80 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एअरलाईन्सने सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. त्याचवेळीकोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या केव्हांच 2000 च्या वरती पोहोचली आहेशिवाय 50 पेक्षा जास्त लोक कोरोनाच्या कारणामुळे मरण पावले आहेत.

From around the web