कोरोनाच्या भीतीने कुटुंबाने सोडली साथ...

 
रुग्णाला डॉक्टरांनीच भरवले जेवण !

कोरोनाच्या भीतीने कुटुंबाने सोडली साथ...


कोरोना विषाणू म्हणजे भीतीचे दुसरे एक नाव बनले आहे. लोक या विषाणूची इतकी भीती बाळगतात की ते त्यांच्या जवळच्या कुटूंबापासून आणि नातेवाईकांपासूनही बरंच अंतर ठेवत आहेत. नुकतीच अशीच एक बाब समोर आली आहे जिथे रूग्णाच्या कुटुंबातील लोक कोरोना पीडिताला भेटायला आले नव्हते. त्यानंतर एका डॉक्टरांनी स्वत: च्या हातांनी त्याला भोजन दिले.  या हृदयस्पर्शी क्षणाचे एक छायाचित्रही समोर आले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अरुण जनार्दन नावाच्या सोशल मिडिया अकाऊंट वापरकर्त्याने हा व्हायरल फोटो ट्विटरवरून इतरांशी शेअर केला आहे. या चित्राविषयी माहिती देताना ते म्हणाले की सदर रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात यायला असमर्थ होते किंवा येऊच शकत नाहीत. मग अशा परिस्थितीत मद्रास मेडिकल मिशनचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट असलेल्या डॉ जॉर्जियन अब्राहम यांनी स्वत: च्या हातानेच त्यांच्या या रुग्णाला खायला दिले.

दरम्यान, देशात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती 3374 इतकी झालेली आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूमुळे तब्बल 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे ही आकडेवारी दररोज वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसारगेल्या 24 तासांत 472 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे.

From around the web