कोरोनामुळे स्मृती जाण्याची शक्यता

 
एका संशोधनातून स्पष्ट 

कोरोनामुळे स्मृती जाण्याची शक्यता

ज्यापद्धतीने कोरोना विषाणू लोकांना आपल्या कचाट्यात  पकडत आहे. त्याच प्रकारे   रुग्णांमध्ये त्याची लक्षणे देखील बदललेली  आढळत आहे. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, कोरोना विषाणूच्या परिणामामुळे बोलण्याची तसेच श्वास  घेण्याची क्षमता कमी होते. त्याचवेळी आणखी एका संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोनामुळे डोक्यात, मेंदूत बदल घडून स्मृती कमी होणे देखील होऊ शकते. कारण कोरोनाचा परिणाम मेंदूतल्या अनेक भागांवर होत असतो. पिट्सबर्ग विद्यापीठासह जगभरातील न्यूरोलॉजिस्ट या गोष्टीची पुष्टी करीत आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा परिणाम रुग्णांच्या घश्यावर आणि फुफ्फुसांवर प्रथम झाला. आता त्याचा परिणाम मेंदूवरही दिसून येत आहे असे कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हे दिसून आले आहे. तज्ञांनी त्याला ब्रेन डिसफंक्शन असे नाव दिले आहे. या अंतर्गत मेंदूत सूज येते मग डोक्यात वेदना होतात आणि रुग्ण हळूहळू स्मृती देखील गमावू लागतो.

कोरोना विषाणू हा रुग्णांच्या मेंदूवर कसा परिणाम करत आहे याचे एक उदाहरण मिशिगनच्या डेट्रॉईटमध्ये पाहिले जाऊ शकते , विमानसेवेत काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षांच्या महिलेला कोरोना संसर्ग झाला. त्यांनी आधी डोकेदुखीची तक्रार केली. जेव्हा त्याचा मेंदू स्कॅन केला गेला तेव्हा असे आढळले की मेंदूच्या बर्‍याच भागात वेगवेगळ्या सूज आहेत.

 मेंदूच्या एका भागाच्या काही पेशी खराब झाल्या आहेत.  डॉक्टरांनी रुग्णाच्या डोक्याची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे वर्णन केले आणि त्यास  'एक्यूट नेक्रोटिझिंग एन्सेफॅलोपॅथीअसे नाव दिले. त्याचप्रमाणेहेनरी फोर्ड हेल्थ सिस्टमच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. एसिजा फोर यांच्या मते कोरोना इन्फेक्शननंतर काही दिवसांतच मेंदूमध्ये वेगाने सूज उद्भवते आणि नंतर ती कायम राहते.

From around the web