Header Ads

देशात मृतांची संख्या शंभर ओलांडली

तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट


नवी दिल्ली - भारतातील कोरोनामधील मृतांची संख्या शंभर ओलांडली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी ९ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात १०९  लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 4,067 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 3,666 चा उपचार चालू आहे. 291 लोक बरे झाले आहेत केवळ तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर तब्लिगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाली नसती तर देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तब्लिगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. मरकज प्रकरण नसतं झालं तर भारताचा कोरोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'Covid-19 चे रूग्ण सध्याच्या स्थितीत दिवसाला सरासरी 4.1 असे दुप्पटीने वाढत आहेत.


कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

   वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते जगातील 209 देशांमध्ये 11,36,851 रुग्ण आढळले आहेत. 62,955 लोक मरण पावले  

No comments