पतंजलीचा दावा : आयुर्वेदाच्या सहाय्याने कोरोनावर यशस्वी उपचार

 

पतंजलीचा  दावा : आयुर्वेदाच्या सहाय्याने कोरोनावर यशस्वी उपचार


पतंजली योगपीठाचे आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण यांनी असा दावा केला आहे की, आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने कोरोना रुग्णावर केवळ उपचारच शक्य होतील असे नाही तर आयुर्वेदिक औषधांचा कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लस म्हणूनही  उपयोग केला जाऊ शकतो. आचार्य बालकृष्ण म्हणाले की ,  पतंजली संशोधन संस्थेत कोरोनावर तीन महिन्यांपासून संशोधन सुरू होते तसेच उंदीरांवर करण्यात आलेल्या अनेक यशस्वी चाचण्यांनंतर हा निष्कर्ष समोर आलेला आहे.

निष्कर्षात असे आढळून आले आहे की अश्वगंधागुळवेल तुळशी आणि श्वसारीचा यांच्या रसाचे विशिष्ट प्रमाणात सेवन केल्यास कोरोना संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी होते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या 150 हून अधिक वनस्पतींच्या 1550 संयुगांवर दिवसरात्र संशोधन करत 12 पेक्षा अधिक संशोधकांनी हे यश संपादन केले आहे. पतंजली संशोधन संस्थेचे प्रमुख व उपाध्यक्ष डॉ. अनुराग वार्ष्णेय म्हणाले कीकोरोनाच्या उपचाराची संपूर्ण पद्धत ही महर्षि चरक यांच्या 'चरक संहिताया प्रसिद्ध ग्रंथावर तसेच आचार्य बालकृष्ण यांच्या सध्याच्या प्रयोगांवर आणि विचारांवर आधारित आहे.

डॉ. अनुराग वार्ष्णेय म्हणाले की कोविड - 19 हा कोरोना कुटुंबातील सर्वात नवीन आणि अधिक धोकादायक असा विषाणू आहे. त्याची प्रकृती आधी आलेल्या एकाच कुटूंबाच्या  'सार्सविषाणूसारखीच आहे.
डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितले की कोविड -19 अथवा कोरोनावरील औषधांच्या शोधासाठी आधीच्या सार्स विषाणूच्या संशोधनातून संशोधक चमूला मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्यानंतर सार्स विषाणू आणि कोविड -19 च्या कार्यप्रणालीवर संशोधन करण्यात आले. यामध्ये ,  दोघांची समानता आणि फरक ठरवण्याबरोबरच मानवी शरीरात कोविड -19 ची कार्यप्रणाली व आणि मारकता यांचा विस्तृत अभ्यास केला गेला.

जानेवारीतच संशोधन सुरू झाले होते
डॉ. वार्ष्णेय म्हणाले की ,  योगगुरू बाबा रामदेव यांच्या सल्ल्यानुसार आणि निर्देशानुसार आचार्य बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२० मध्ये त्यावर संशोधन सुरू झाले. या संशोधनात पाच महिलांसह 14 शास्त्रज्ञांच्या टीमचा समावेश होता. जवळपास तीन महिन्यांपर्यंत चाललेल्या गहन स्वरूपाच्या संशोधनानंतर हे निष्कर्ष प्राप्त झाले.

'नोजल ड्रॉपम्हणून वापरला जाऊ शकतो
डॉ वार्ष्णेय म्हणाले की ,  या व्यतिरिक्त अत्यंत संरक्षणासाठी आपण आयुर्वेदिक आण्विक तेलाचा उपयोग  नोजल ड्रॉप’ म्हणून करू शकतो. दररोज सकाळदुपारसंध्याकाळ नाकात चार थेंब घालणे हे जणू रामबाण औषधासारखेच कामी येत. त्यांनी असा दावा केला की ही औषधे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रमुख संस्थाजर्नल्स इ. पासून प्रमाणित आहेत.

From around the web