Header Ads

पोलीस झाले भूत !

कोरोनाविषयीची अनोखी जनजागृती !!कोरोनाचा होणारा मोठा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार सर्वत्रच लॉकडाउनचा अवलंब करीत आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि पोलिसही त्यांच्या पद्धतीने जनजागृती करण्याचे काम करत आहेत. तसेच मध्य प्रदेशातही पोलिसांनी कोरोना नावाच्या महामारी विरोधात कसे लढता येईल हे लोकांना सांगतायत. त्यासाठी पोलिसांनी भुताचे कपडे घातले आहेत.

लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्यासाठी इंदूरच्या विजय नगर पोलिसांनी स्वयंसेवकांची एक टीमच तयार केलेली आहे. ते सगळे भुतांच्या आत्म्याच्या रूपाने रस्त्यावर भटकून त्यापासून अथवा कोरोनारुपी भूतापासून दूर राहण्याची शिफारस करतात. एवढेच नाही तर ते झोपडपट्टीत जाऊन ग्रामस्थांना स्वच्छतेची काळजी घेण्यास सांगतात, स्वच्छतेचे धडे गिरवून घेत आहेत.

पोलिसांच्या या अनोख्या मोहिमेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विजयनगर पोलिस स्टेशन प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार,एकूण सहा स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे. जे लोक कोविड -19  च्या बाबतीत जागरूक नसतात अशा वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये ते भूताच्या वेषात पोहोचतात व जनजागृती करतवतात. याव्यतिरिक्त  ते लॉकडाउनचे उल्लंघन करणार्‍यांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देत असतात.

No comments