फेसबुकवर जुना फोटो शेयर करण्याचा ट्रेंड जोरात ...

 
फेसबुकवर जुना फोटो शेयर करण्याचा ट्रेंड जोरात ...

सोशल मीडियावर कोणत्या वेळी कोणता ट्रेंड येईल, हे सांगता येत नाही. सध्या जुन्या फोटोचा ट्रेंड  आला असून, नेटिझन्स आपल्या फेसबुक वॉलवर जुने फोटो शेयर करीत असल्याने जुन्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. तसेच त्याखाली मित्राची इरसाल कमेंट चांगलीच करमणूक करीत आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वजण घरीच बसून आहेत. लोकांना टाईम कसा घालवावा ? असा प्रश्न पडला आहे. काहीजण पुस्तक वाचत आहेत, काहीजण कॅरम,बुद्धिबळ खेळत आहेत तर काहीजण दिवसभर सोशल मीडियावर टाईमपास करीत आहेत.

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या नेटिझन्सनी नवीन शक्कल काढली आहे.  सध्या फेसबुकर जुन्या फोटाेंचा ट्रेड सुरू करण्यात आला आहे. त्या खाली लिहिन्यात येत असलेल्या गमतीदार कॉमेंटमुळे चांगलीच करमणूक होत आहे. फेसबुकवर सध्या कोरोना विषाणूबद्दलची माहिती शेअर करण्यासोबत जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फेसबुकवर याआधी अपलोड केलेल्या फोटोंसह घरात असलेल्या अल्बममधून फोटो काढून ते शेअर केले जात आहेत.

 फेसबुकवर मित्रांसोबतचे जुने फोटो शेअर करताना त्या मित्रांनाही टॅग केले जात आहे. तसेच याबाबतचा मेसेज तयार करून व्हाट्सएपग्रुप वर सेंड केला जात आहे. त्यामुळे आपल्या एखाद्या मित्राने आपले जुने फोटो शेअर केले की लगेच आपणही आपल्याकडील संग्रहातील जुने फोटो सेंड करायचे अशी भावना तयार झाली आहे. त्याप्रमाणे फोटोही शेअर होत आहेत. त्यात भर म्हणजे शेअर केलेल्या त्या फोटो पेक्षा जास्त चर्चा होते ती त्यावरील प्रतिक्रियांची. कारण एखाद्या मित्राने फोटो शेअर केला की त्यावर लगेच प्रतिक्रिया यायला सुरुवात होते. यात जास्तीचा भर आहे तो कविता आणि उखाण्याचा. या प्रतिक्रिया खूप विनोदी आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा

आपल्या जीवनातील काही आठवणी, क्षण आपण सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून शेअर करतो. त्यामुळे फेसबुकवर अनेक फोटो असतात. पण आपल्याला लक्षात नसते. तसेच आपल्या मित्राकडे आपल्या लहानपणीचा फोटो असतो. तो जर त्याच्याकडून आत्ता शेअर झाला तर खूप आनंद वाटतो. सध्याच्या जुन्या फोटोंच्या ट्रेंड मुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. यावर येणाऱ्या कमेंट मुळे काही जण दुखावले जात असल्याचे दिसत आहे.

From around the web