आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीपंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन असल्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर बंद आहे. असे असताना शनिवारी पहाटे  चैत्री पौर्णिमेची शासकीय महापूजा भाजप आमदार आणि  मंदिर समितीचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे ठाकूर आणि मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल -रुक्मिणीचे  मंदिर भाविकांना दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र सर्व नित्योपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळेच यंदाची  चैत्री पौर्णिमा यात्रा भरली नव्हती, पंढरपूरचे वाळवंट दरवर्षी भाविकांनी फुललले असताना यंदा सर्व परिसर वाळवंट दिसत होता. 

असे असताना, शनिवारी पहाटे  चैत्री पौर्णिमेची शासकीय महापूजा भाजप आमदार आणि  मंदिर समितीचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी संभाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींनी हजेरी लावली.त्यानंतर अनेकांनी दर्शन घेतले. एकीकडे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड शुक्रवारी पंढरपुरात आले असता, त्यांनी सर्वसामान्य माणसाला दर्शन बंद आहे तर मी मंदिरात जाणार नाही, अशी भूमिका घेत मंदिरात गेलो तर चुकीचा संदेश जाईल म्हणून संत चोखोबा समाधीवर दर्शन घेऊन लांबूनच श्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेतले. 

लॉकडाऊनचे नियम तोडल्यामुळे आ.सुजितसिंह ठाकूर,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत, आ. सुजितसिंह ठाकूर उस्मानाबादचे असल्यामुळे त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. 

पुर्वनियोजित पूजा - आ.ठाकूर

 आ.सुजितसिंह ठाकूर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला ते म्हणाले की,  चैत्री पौर्णिमेची शासकीय महापूजा आपल्या हस्ते पूर्वनियोजित होती, एरव्ही दर्शन बंद असले तरी  नित्योपचार सुरु आहेत, शनिवारी झालेली शासकीय महापूजा    चैत्री पौर्णिमेनिमित्त होती. यावेळी आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले आहेत.  

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असून, आपल्याला याविषयी जास्त भाष्य करायचे नाही, असेही  ठाकूर म्हणाले. 

1 comment

Unknown said...

मुस्लिमांनी मजरत मधून सगळ्या भारतात कोरोना पसरवला तेव्हा कुठे गेले होते हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते