मरकजला जावून आलेल्या लोकांनी स्वतःहून समोर यावे अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी 

 
मरकजला जावून आलेल्या लोकांनी स्वतःहून समोर यावे अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील जे नागरिक दिल्ली येथील मरकज येथे जाऊन आलेले आहेत त्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन स्वतःच्या आरोग्याची तपासणी करावी व प्रशासनाला माहिती द्यावी अन्यथा अशा लोकांविरुद्ध प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत, पैकी दोघांचे  मरकज कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे.



 उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील उपचाराच्या सर्व सेवा बंद करण्यात आलेला आहेत. तरी कोणत्याही नागरिकांनी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाऊ नये. तसेच उमरगा शहरातील सर्व खाजगी रुग्णालय प्रशासनाने ताब्यात घेतलेले आहे त्यामुळे उमरगा तालुक्यातील नागरिकांनी शहरी भागासाठी उमरगा शहरातील खाजगी रुग्णालयात तर ग्रामीण भागासाठी मुरूम सास्तूर लोहारा या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले

कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण 

सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये उस्मानाबाद मध्ये चार रुग्ण दाखवण्यात आलेले आहेत.तो  उस्मानाबाद जिल्ह्यातील असला तरी तो मुंबई येथे त्यांचे सॅम्पल रिपोर्ट पॉझिटिव आलेले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कुणीही अफवा पसरऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे. 

उस्मानाबाद सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश  समाज माध्यमावर  प्रसारित करणाऱ्यावर व एडमिन वर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.

From around the web