Header Ads

जम्मू-काश्मीर : ९ दहशतवाद्यांचा खात्मा


उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या  ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.. काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराने 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या मोहिमेत 1 सैनिक शहीद झाला आहे. एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत ट्विट केलं आहे.

 गेल्या २४ तासांत भारतीय लष्करानं काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे काल ४ दहशवादी मारले गेले. तर इतर ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते.

या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने जखमी जवानांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अद्यापही हे ऑपरेशन सुरुच आहे, अशी माहिती देखील लष्करी सुत्रांनी दिली असल्याचे ट्विट एएनआयनं केलं आहे.

No comments