या गरीब शेतकऱ्याची दानत पाहून तुम्ही व्हाल नतमस्तक

गोरगरीब लोकांसाठी  दान केली दोन एकर केळीची बाग 

तुळजापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे उद्योगपती, राजकीय नेते, सेलिब्रेटी यांनी मोठी देणगी जाहीर केली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका गरीब शेतकऱ्याने आपली दोन एकर केळीची बागच दान करून अनेकांना प्रेरणा दिली आहे.


हे आहेत, तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील शेतकरी विकास रामलिंग पठाडे. त्यांनी आपली दोन एकर केळीची बाग गोरगरीब आणि स्थलांतरित लोकांसाठी दान केली आहे. एकीकडे कोरोनामुळे उद्धभवलेल्या बिकट परिस्थितीत काही दलाल गैरफायदा घेत असताना हा शेतकरी आपली केळीची बाग दान करून गोरगरीब लोकांसाठी अन्नदाता ठरला आहे.

उस्मानाबाद जिल्हा हा नेहमी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तरीही काही शेतकऱ्यांनी उण्यापुऱ्या पावसावर केळीची बाग जगविली आहे. केळीच्या उत्पदानातून किमान तीन लाख रुपये मिळत असताना त्यावर पाणी सोडून या शेतकऱ्याची दानशूर वृत्ती जगाला प्रेरित करून सोडणारी आहे.


कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब लोकांवर तसेच स्थलांतरित लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पोटात माझे दोन केळी गेली तरी मला समाधान आहे, अशी भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ 


No comments