Header Ads

स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसाचा कोरोनामुळे मृत्यू


कोरोना विषाणूमुळे आजारी असलेली स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे रविवारी सकाळी निधन झाले. मरिया जगातील राजघराण्यातील पहिली सदस्य आहे जी कोरोना या महामारीमुळे मरण पावली. 86 वर्षांची राजकुमारी मारिया ही स्पेनच्या किंग फेलिपची चुलत बहिण होती. प्रिन्स मारियाचा भाऊ प्रिन्स सिक्स्टो अनाएरिक डी बोर्बनने त्याच्या फेसबुक पेजवर राजकुमारीच्या मृत्यूची बातमी शेअर केली तेव्हा जगाला ही बातमी समजली.

 कोरोना व्हायरस समोर संपूर्ण जग हतबल झालं आहे. कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहे. स्पेनमध्येही कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. स्पेनमधील शाही परिवारातील राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शाही परिवारातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

प्रिन्स सिंटोच्या म्हणण्यानुसार, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये राजकुमारी मारिया यांचे निधन झाले. कोरोना विषाणूच्या भीतीपोटी स्पेनचा राजा फेलिप याची तपासणी करण्यात येत होती त्याचवेळी प्रिन्सेस मारिया यांचे निधन झाले असल्याचे समजले. परंतु कोरोनाच्या तपासणीत राजा फेलिपचा निकाल नकारात्मक असल्याचे निष्पन्न झाले.

 28 जुलै 1933 रोजी जन्मलेली राजकुमारी मारिया हिने फ्रान्समध्ये शिक्षण घेतले त्यानंतर ती पॅरिस विद्यापीठात प्राध्यापक पदावर कार्यरत होती. राजकुमारी मारिया माद्रिदमधील एका विद्यापीठातही शिकवत होती. ती तिच्या मुक्त विचारांसाठी परिचित होती तसेच ती 'रेड प्रिन्सेस' म्हणूनही ओळखली जात असे. शुक्रवारी माद्रिद येथे तिचे अंतिम संस्कार पार पडले.

त्याचबरोबर ब्रिटनचा प्रिन्स चार्ल्ससुद्धा कोरोनामुळे आजारी आहे. प्रिन्स चार्ल्स अनेक दिवस स्वत: ला इतरांपासून अलग ठेवून आहेत तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोहान्सन यांनाही कोरोनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासांमध्ये 844 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 5982 झाला आहे. स्पेनमधील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्पेनमध्ये कोरोनाने तिसरा टप्पा पार केला आहे. त्यामुळे लवकरच कोरोना बाधितांच्या संख्येत कमतरता येईल. प्रशासनाने सांगितले की, सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 73 हजारांवर पोहोचली आहे.

No comments