देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

 
देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

नवी दिल्ली  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे.  हे लॉकडाउन आज रात्री 12 पासून लागू होईल. यावेळी प्रत्येकास बाहेर जाण्यास मनाई असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही जिथेही देशात असाल तेथे रहा.

सद्य परिस्थिती पाहता, हा लॉकडाऊन देशात 21 दिवसांचा असेल. येणारे 21 दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, कोरोना विषाणूच्या संसर्गाचे उल्लंघन करण्यासाठी कमीतकमी 21 दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे. या लॉकडाऊनची आर्थिक किंमत नक्कीच देशाला सोसावी लागेल.परंतु यावेळी प्रत्येक भारतीयांचे प्राण वाचविणे ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे,

’ करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे  पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 

  • आज रात्री १२ वाजल्यापासून पूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन... 
  • सर्व राज्य, शहर, गाव ३ आठवडे बंद, घरातून बाहेर निघण्यास बंदी... 
  • तज्ञ सांगतात कि, संक्रमण रोखण्यासाठी ३  आठवडे आवश्यक, तसं नाही केलं तर देश २१ वर्ष मागे  जाईल... 
  • तुमच्या घराबाहेर लक्षणरेषा आखण्यात आलीये, तुम्ही त्यापलीकडे एक पाऊल आजाराला  घरात आणेल. 
  • इटली आणि अमेरिका या देशांमधल्या पायभूत सुविधा उत्तम आहेत, तरी तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. 
  • हा आजरा इतक्या वेगाने पसरतो कि, कितीही तयारी केली तरीही संकट मोठा होत जातं 
  • सोशल  डिस्टन्सिंग ( घरात बसून राहणं ) हा कोरोना मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे . 
  • एकदा कोरोना पसरू लागला की, थांबवण फार कठीण जातं, म्हणून आताच संक्रमण थांबवावं लागेल. 
  • गरिबांसाठी कठीण काळ आहे, सरकार आणि सन्घटना गरिबांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. 
  • हॉस्पिटलला सुसज्ज करण्यासाठी १५ हजार कोटी खर्च करणार 
  • देशभरात मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्याचं प्रशिक्षणासाठी काम सुरु झाले आहे. 
काय राहणार सुरू?
  • बँका,एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
  • जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
  • शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था
  • अन्न,औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या इ-कॉमर्स,ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
  • दूध, भाजी, फळ,बेकरी मांस, मासे,अंडी विकणारी दुकानं, ते साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
  • प्राण्यांचे दवाखाने
  • पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था,तेलकंपन्या,त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
  • वर दिलेल्या संस्थांना मदत करणाऱ्या संस्था
  • फक्त औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दुध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स,डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स, आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
  • सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी वृंदासह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर हवे. अशा ठिकाणी हात धुण्याची सुविधा तसंच हँड सॅनिटायझर हवे.

काय होणार बंद?

  • राज्य परिवहन सेवा, खाजगी बस, मेट्रो, लोकल बंद करण्यात आल्या आहेत.दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही,तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे. तसंच खाजगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि एक व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
  • सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवा मिळवण्यासाठीच त्यांना बाहेर पडता येईल.त्यासाठी बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.



From around the web