Header Ads

“संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 7 गुन्हे दाखल.”


तुळजापूर: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे असतांनाही 1) सौरभ तुकाराम करपेकर 2)काशीनाथ शिवानंद बिराजदार 3)अतिष संतोष लोंढे 4)जमीर बाबु शेख 5)अनिकेत मनमंत मायराने 6)सागर संतोष लोंढे 7)नागनाथ आबासाहेब भिसे 8)समाधान दत्तात्रय जगताप 9)सरफराज मुन्ना शेख 10)किरण विठ्ठल इंगळे 11)प्रसाद संजय मुखेडकर सर्व रा.तुळजापूर हे एकत्रीत जमाव करुन दि. 26.03.2020 रोजी 22.40 वा. कमानवेस, तुळजापूर येथे स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावलेल्या स्थितीत पो.ठा. तुळजापूर येथील सपोनि श्री. गणपत राठोड यांच्या पथकास आढळुन आले. तर- 1)अविनाश शिवाजी जगदाळे 2)ऋषीकेश कृष्णाथ गायकवाड 3)अंकुश शेकबा सोनटक्के 4)नवनाथ विश्वनाथ कांबळे 5)जावेद सल्लाउद्दीन काझी 6)श्रीकांत गोविंदराव मुंडे 7)बालाजी उत्रेश्वर कानवले सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व दि. 27.03.2020 रोजी उस्मानाबाद शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असतांना पो.ठा. उस्मानाबाद (शहर) यांच्या पथकास गस्तीदरम्यान आढळुन आले. अशा प्रकारे वरील व्यक्तींनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये वरील व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 7 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments