Header Ads

जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या चालू ठेवल्या, आणखी 14 गुन्हे दाखल...

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्शभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असताना तो आदेश  झुगारुन पानटपऱ्या चालू ठेवणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी  14 पान टपरी चालकावर गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. कालच आठ पान टपरी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी इत्यादी बंद ठेवण्याचा  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचा आदेश झाला आहे. असे असतांनाही महादेव पवार, विठ्ठल गोपाल जगताप दोघे रा. वाकडी, ता. परंडा, संतोष मदनलाल शर्मा रा. ब्रम्हगांव, ता.परंडा, बबन बिरु क्षिरसागर रा. सिंदफळ, ता.तुळजापूर, धम्मपाल अंकुश पांडागळे, धिरज लक्ष्मीकांत ढोकर दोघे रा.काक्रंबा, ता.उस्मानाबाद, सिराज अब्दुल्ला शेख, मनोज कोकाटे, सुरेश बाबुराव पवार, काशिनाथ गोरख जाधव सर्व रा. तुळजापूर, इम्रान तांबोळी, इरशाद नवाब मुजावर दोघे रा. उस्मानाबाद, अभिजीत मच्छींद्र मडके रा. मोहा, ता. कळंब, दिगंबर किसन कदम रा. मस्सा, ता. कळंब या सर्वांनी आपापल्या गावी दि. 19.03.2020 रोजी हा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, दुकाने, हॉटेल इत्यादी चालू ठेउन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 14 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 19.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments