Header Ads

कोरोना : आ. कैलास पाटील एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्शभूमीवर उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एक आदर्श निर्णय घेतला आहे. आमदारांना मिळणारे एक महिन्याचे वेतन त्यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याचे जाहीर केलं आहे. उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना आ.पाटील यांनी ही माहिती दिली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व  नियमांचे पालन करावे, घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 आमदारांना दरमहा जवळपास दोन लाख रुपये मानधन मिळते, राज्यातील इतर आमदार उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचे अनुकरण करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

No comments