Header Ads

कानेगावचा जावई दानशूर ! मात्र, सासुरवाडी निघाली फुकट खाऊ !लोहारा  - तालुक्यातील आरणी गावच्या बळवंत थिटे या शेतकऱ्याने शक्कल लढवत मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोळा करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी शेतातील कलिगंड सासुरवाडीत विक्रीसाठी आणले. सोशल डिस्टेंस म्हणून त्यांनी त्याठीकाणी पैशासाठी एक बॉक्स ठेवला. सासुरवाडीच्या लोकांनी   कलिंगड घेऊन खोक्यात पैसे टाकणे अपेक्षित होते. मात्र, फुकटखाऊ सासुरवाडीचे  लोक पैसे न टाकताच कलिंगड घेऊन गेले.त्यामुळे जावयाच्या स्वप्नावर पाणी पडले.  

बळवंत थिटे यांनी ऐक फेसबुक पोस्ट लिहीली. यात त्यांनी सांगितले की, माझ्या शेतातील  कलिंगड विक्रीतून मिळालेली अर्धी रक्कम कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून जमा करायची आहे. त्यामुळे बाहेरच्या बाजारात 30 रुपयांना असलेले कलिंगड फक्त 20 रुपयांना विकायचे आहे. ह्याच उद्देशाने बळवंत थिटे यांनी शेतातील निघालेले कलिंगड कानेगाव या त्यांच्या सासुरवाडीत  नेऊन विकण्याची तयारी केली. पैसे गोळा करण्यासाठी एक बॉक्स घेतला. त्या बॉक्स कलिंगड विक्रीतून मिळालेली अर्धी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करायची आहे. अर्धी रक्कम ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी असेल त्यामुळे आपण यातील कुठलेही एक कलिंगड घ्या आणि या बॉक्स मध्ये 20 रुपये जमा करा असे लिहीले.

त्यानंतर   सोशल डिस्टेंस म्हणून    बळवंत थिटे हे कलिंगड विक्रीच्या दुकानापासून दूर जाऊन थांबले. यानंतर कानेगावकरांनी थिटे यांच्या कलिंगडावर ताव मारला. अवघ्या अर्ध्या तासात 1 हजार कलिंगड संपवले. 1 हजार कलिंगडा मागे प्रति कलिंगड 20 रुपये दराप्रमाणे 20 हजार रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र, फुकट खाण्याची सवय लागलेल्या कानेगावकरांनी या बॉक्समध्ये फक्त 554 रुपये जमा केले. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोळा करण्याच्या बळवंत थिटे यांच्या स्वप्नाला सासरवाडीच्या लोकांनी अक्षरशः सुरुंग लावला.

जमा झालेल्या ५५४ पैकी २७२ रुपये थिटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऑनलाईन पाठवले आहेत

No comments