Header Ads

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका ...


कळंब - एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट उभे असताना, निसर्गानेही आज शेतकऱ्यांना धोका दिला.उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्यात बुधवारी  अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यात गारांचा मारा झाला, त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या ज्वारी आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीने पाण्यात गेला असताना रब्बी  पिकेही अवकाळी पावसाने धुवून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . शेतात ज्वारी आणि गहू उभा आहे, तसेच अनेक ठिकाणी काढणी सुरु आहे.  मात्र बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी द्राक्षाचा बागा जगविल्या आहेत, अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे घड खाली गळून पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रात्री ११ वाजण्याचा सुमारास उमरगा शहर आणि तालुक्यातही गारांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 
Video

No comments