Header Ads

दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस


पोलीस ठाणे, बेंबळी: अर्जुन संभाजी इंगळे रा. राजुरी, ता.उस्मानाबाद यांच्या राहत्या घराची खिडकी अज्ञात चोरट्याने दि. 29.03.2020 रोजी 01.00 ते 06.00 वा. चे दरम्यान उचकटुन घरामध्ये असलेल्या दोन कपाटातील 44 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2,000/-रु. किंमतीचे चांदीचे दागिने, एक इंटरनेट राउटर किं.अं. 2,000/- रु. व रोख रक्कम 42,000/- रु. असा एकुण 1,46,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या अर्जुन इंगळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


मारहाण, 4 गुन्हे दाखल.
पोलीस ठाणे, कळंब: बालाजी बाबासाहेब खराटे रा. भोगजी, ता.कळंब यांनी मद्यधुंद अवस्थेत दि. 29.03.2020 रोजी 12.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी पत्नी- वैशाली खराटे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा जाब मेव्हना- गहीनीनाथ मोराळे रा. दहिफळ यांनी बालाजी खराटे यांना विचारला असता बालाजी यांनी गहिनीनाथ यांना धक्काबुक्की करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले व जिवे ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वैशाली खराटे यांच्या फिर्यादीवरुन बालीजी खराटे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: अक्षय काशिनाथ गोरे, प्रमोद शिवाजी गोरे, तानाजी शिवाजी गोरे सर्व रा.अंतरगाव, ता.भुम यांनी दि. 29.03.2020 रोजी 17.00 वा. सु. सामाईक शेतबांधाचा वाद उकरुन काढून भाऊबंद बब्रुवान कोंडीबा गोरे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना त्यांच्या घरा समोर शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बब्रुवान गोरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: हनुमंत विठ्ठल खैरे, गिता हनुमंत खैरे, रुक्मीणीबाई खैरे सर्व रा. हिंगळजवाडी, ता.उस्मानाबाद यांनी दि. 30.03.2020 रोजी 10.00 वा. सु. हिंगळजवाडी येथे पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून गावातीलच भाग्यश्री बालाजी मुळे व आशा कानडे या दोघींना शिवीगाळ करुन, डोळ्यात चटणी टाकून, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भाग्यश्री मुळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: युवराज सोनवणे रा. अपसिंगा, ता.तुळजापूर याने दि. 24.03.2020 रोजी 16.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी भांडणाची कुरापत काढून पत्नी- अन्नपुर्णा हिस शिवीगाळ करुन, पाठीवर चाकुने वार करुन जखमी केले. त्यांचा मुलगा भांडणे सोडवण्यास आला आसता त्याच्या हातावर चाकूने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अन्नपुर्णा सोनवणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
1) शितल राहुल काळे रा. जुना बसडेपो, पारधी पिढी, उस्मानाबाद या दि. 29.03.2020 रोजी जुना बसडेपो, पारधी पिढी येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना विदेशी दारुच्या 199 बाटल्या कि.अं. 50,000/-रु.च्या मालासह स्था.गु.शा., उस्मानाबाद यांच्या पथकास आढळुन आल्या. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

2) भैरवसिंग गोपाळसिंग राजपुत रा. तावशीगड, ता.लोहारा हे दि. 29.03.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना देशी दारुच्या 17 बाटल्या कि.अं. 884/-रु.च्या मालासह पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

3) सविता भगवान पवार रा. पारधी पिढी, सांजा, ता.उस्मानाबाद या दि. 29.03.2020 रोजी पारधी पिढी, सांजा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना 12 ली. गावठी दारु कि.अं. 580/-रु.च्या मालासह पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळुन आल्या. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

4) निता धनाजी धुमाळ रा. आलूर, ता.उमरगा या दि. 29.03.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना 15 ली. गावठी दारु कि.अं. 950/-रु.च्या मालासह पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळुन आल्या व पोलीसांची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेउन पळून गेल्या. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments