Header Ads

बालकांच्या लैंगिक शोषनाचे छायाचित्र प्रसिध्द करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल


कळंब: एका तरुणाने बालकांच्या लैंगिक शोषनाबाबतचे व्हिडीओ- छायाचित्र इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत केले होते. अशा प्रकारच्या अन्य गुन्ह्यांत लातूर सायबर पोलीस ठाण्याचे पथक तपासावर होते.
 तपासादरम्यान सदर गुन्ह्याचे घटनास्थळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात दाखवत असल्याने त्यांनी उस्मानाबद सायबर पो.ठा. येथे संपर्क साधुन सदर प्रकरण वर्ग केले. त्यावरुन सायबर पो.ठा. चे पोकॉ- मनोज मोरे यांनी दिलेल्या सरकार तर्फे फिर्यादीवरुन संबंधीत तरुणाविरुध्द पो.ठा. कळंब येथे गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास उस्मानाबाद सायबर पो.ठा. चे पथक करीत आहे.

“अल्पवयीन मुलीचे अपहरण.”

नळदुर्ग: एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 17.03.2020 रोजी 17.00 वा. सु. घरा बाहेर कामा निमीत्त गेली होती. परंतु ती घरी परतली नाही. यावरून कुंटुबीयांनी तिचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहीती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दि.21.03.2020 रोजी नोंदविण्यात आला आहे.

महिंद्रा फायनान्सच्या वसुलदाराकडून पैशांचा अपहार

 बेंबळी: सुरेश रामराव कांबळे रा. श्रीराम कॉलनी, सेलु, जि. परभणी हे महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा, उस्मानाबाद येथे फेब्रुवारी- 2019 ते ऑगस्ट-2019 या कालावधीत वसुली अधिकारी म्हणुन असतांना कर्जदारांकडून वसुल केलेली कर्जाची रक्कम फायनान्स कंपनीत न भरता, कर्जदारांना कर्ज भरल्याच्या पावत्या न देता वसुल केलेली एकुण 5,01,950/- रु.  रक्कमेचा स्वत: च्या फायद्यासाठी अपहार केला. अशा प्रकारे त्यांनी कर्जदाराची व महिंद्रा रुरल फायनान्सची फसवणुक केली. अशा मजकुराच्या शेखर वीर यांच्या फिर्यादीवरुन सुरेश कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

 “मारहाण, 3 गुन्हे दाखल.”

मुरुम: फिरोज पठाण, सिध्दीक पठाण, फैयाज पठाण एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. दाळींब, ता. उमरगा यांनी दि. 20.03.2020 रोजी 17.30 वा. सु. सरकारी दवाखाना समोर, दाळींब येथे पुर्वीच्या भांडणाचा राग मनात घरुन गावातीलच महावीर ज्ञानोबा सुरवसे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या महावीर सुरवसे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments