ग्राहकांची गर्दी- दुकान चालकावर गुन्हा दाखल

 

ग्राहकांची गर्दी- दुकान चालकावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन अमित अरुण भराटे रा. शांतीनिकेतन कॉलनी, उस्मानाबाद यांनी दि. 27.03.2020 रोजी 14.18 वा. सु. बालाजीनगर, उस्मानाबाद येथील दुकानात नाका- तोंडास मास्क न लावता, दुकानात आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे न करता त्यांना दुकानात बोलावून गर्दी करुन कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. उ,बाद (श.) येथील ज्ञानेश्वर गोरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम- 188 अन्वये गुन्हा दि. 27.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

दुकान उघडे ठेवले चालकावर गुन्हा दाखल

 कळंब: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने शासनाने फक्त जिवनावश्यक वस्तु दुकाने- आस्थापना उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करुन सागर रुणवाल रा. कथले चौक, कळंब यांनी दि. 28.03.2020 रोजी 12.00 वा. सु. आंबेडकर चौक रस्त्यावरील ‘रुणवाल जनरल स्टोअर्स’ हे दुकान उघडे ठेउन कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. कळंब येथील शिवाजी राऊत यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा दि. 27.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

“मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, दुकाने इत्यादी चालू ठेवणाऱ्यांविरुध्द, 3 गुन्हे दाखल.”

उस्मानाबाद -  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने इत्यादी बंद ठेवण्याचा शासन आदेश झाला असतांनाही दि. 27.03.2020 रोजी 1)बालाजी नंदकुमार यादव रा. शिराढोण यांनी शिराढोण येथे बिअरबार- हॉटेल दारु विक्री करण्याच्या उद्देशाने उघडा ठेवला. तर 2)पांडुरंग वसुदेव राऊत 3)राजकुमार व्यंकट घरबुडवे दोघे रा. कौडगांव, ता.परंडा हे कौडगाव येथे दोन वेगळ्या ठिकाणी पानटपऱ्या उघड्या ठेउन तंबाखुजन्य पर्दार्थांची विक्री करत होते. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 27.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, गुन्हा दाखल

 उमरगा: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन प्रकाश बाबुराव ढगे रा. कांदीवली, मुंबई यांनी दि. 27.03.2020 रोजी 11.30 वा. सु. एकोंडी रोड, उमरगा येथे ट्रक क्र. एम.एच. 47 बीजे 3708 मध्ये 6 प्रवाशी घेउन अवैधरित्या वाहतुक करत असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास गस्ती दरम्यान आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, मो.वा.का. कलम- 66/192 अन्वये गुन्हा दि. 27.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

From around the web