Header Ads

मनाई आदेश झुगारुन दुकाने इत्यादी चालू ठेवणाऱ्यांविरुध्द, 4 गुन्हे दाखल


उस्मानाबाद  -  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने इत्यादी बंद ठेवण्याचा शासन आदेश झाला असतांनाही दि. 24.03.2020 रोजी 1)महादेव विजय गोरे 2)नागेश विश्वनाथ कांबळे दोघे रा. लोहारा यांनी अनुक्रमे लोहारा येथे दोन वेगळ्याठिकाणी हॉटेल व पानटपरी चालू ठेवली तर 3) अजय मोहन डोंगे 4) अनिल बळवंतराव कठारे दोघे रा. उस्मानाबाद यांनी अनुक्रमे उस्मानाबाद येथे दोन वेगळ्या ठिकाणी वर्कशॉप व कापड दुकान चालू ठेवले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


जनावरांची निर्दयीपणे वाहतुक, गुन्हा दाखल.

 भुम: आसाराम त्रिंबक नागपुरे रा. नेवासा, जि.अहमदनगर हा दि. 24.03.2020 रोजी 00.10 वा. सु. गोलाई चौक, भुम येथे ट्रक क्र. एम.एच. 16 सीसी 2929 मधुन 9 म्हशी व 7 रेडके दाटीवाटीने भरुन, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे वाहतुक करत असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळले.  यावरुन वरील आरोपींविरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

दागिने चोरीस.

परंडा: छकुबाई दत्तात्रय शिंदे रा. लोणी, ता. परंडा यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहुन घरातील कपाटातील 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दगिने किं.अं. 1,02,300/- रु. चे दि.19.03.2020 रोजी 20.30 वा. सु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या छकुबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments