Header Ads

कोरोना : विविध गुन्ह्यात आरोपींना शिक्षा

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनाई हुकूम असताना, पानटपरी सुरु ठेवणाऱ्या पान टपरी चालकांना न्यायालयाने दणका दिला आहे. उस्मानाबादचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एका पान टपरी चालकास २०० रुपये तर वाशीच्या  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एका पान टपरी चालकास १ हजार दंड ठोठावला आहे.

पो.ठा. आनंदनगर: भा.दं.वि. कलम -283 नुसार दाखल तीन गुन्ह्यात तीन आरोपींस प्रत्येकी 200/-रु. दंड तर भा.दं.वि. कलम- 285 नुसार दाखल दोन गुन्ह्यात दोन आरोपींस प्रत्येकी 600/-रु. तर कोरोना आजाराच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन पानटपरी चालू ठेवल्याबद्दल आरोपी- नरपतसिंग खुशालसिंग पुरोहित रा. उस्मानाबाद यास भा.दं.वि. कलम 188 नुसार 200/-रु. दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 5 दिवस कारावासाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

पो.ठा. कळंब: कोरोना आजाराच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन पानटपरी चालू ठेवल्याबद्दल भा.दं.वि. कलम -188 नुसार दाखल दोन गुन्ह्यांतील दोन आरोपींस प्रत्येकी  1,000/-रु. दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांनी सुनावली आहे.

पो.ठा. येरमाळा: भा.दं.वि. कलम -185 मधील आरोपी- नंदकीशोर बांगर यास 2000/-रु. दंड व कोर्ट उठेपर्यत कारावासाची शिक्षा तर भा.दं.वि. कलम- 279 मधील आरोपी- सर्जेराव दत्तु शिंदे यास  1,000/-रु. दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी सुनावली आहे.

पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): भा.दं.वि. कलम -283 मधील आरोपी- रामेश्वर धर्माजी चौगुले रा. आळणी, ता. उस्मानाबाद यास 200/-रु. दंडाची शिक्षा तर  भा.दं.वि. कलम- 279 मधील आरोपी- लिंबराज रामभाऊ काळे रा. ढोकी यास 1,000/-रु. दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

पो.ठा. वाशी: रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे, हयगयीने वाहन चालवल्याबद्दल भा.दं.वि. कलम -279 च्या आरोपात दोषी ठरवून एका आरोपीस 1,000/-रु. दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांनी सुनावली आहे.No comments