Header Ads

उस्मानाबादच्या एस.टी. महामंडळाचे आगार प्रमुख म्हणतात, कोरोना नव्हे डेंग्यूची साथ !


उस्मानाबाद - जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार उडवलेला आहे. भारतात ३०० च्या पुढे  कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गेली आहे तर राज्यात आजमितीस ६४ रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतलेला असताना, उस्मानाबाद एस.टी. आगार प्रमुखांना मात्र सध्या कोरोना नव्हे डेंग्यूची साथ आल्याचा साक्षात्कार झाला आहे.

झाले असे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. १८ मार्च रोजी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एस.टी.स्टॅन्डची फवारणी केली तसेच अनेक बस गाड्या फवारणी करून स्वच्छ केल्या. त्यानंतर आगार प्रमुखानी नगर परिषदेच्या वहीवर जो अभिप्राय दिला आहे, तो वाचून आपण नक्कीच चक्रावून जाल.


असा लिहिला अभिप्राय

आज दि.18 -3-2020 रोजी नगर परिषद कर्मचारी यांनी रा.प. महामंडळ आणि बसस्थानकावर येऊन डेंग्यू बाबत फवारणी केलेली आहे, आपण केलेल्या सहकार्याबद्दल रा.प.महामंडळ आभारी आहे.
आगार प्रमुख (वरिष्ठ )रा.प.उस्मानाबाद


कोरोनामुळे सर्व जगातील लोकांची झोप उडाली आहे. वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर कोरोनाच्या बातम्या सुरु असताना, उस्मानाबादच्या एस.टी. महामंडळाचे आगार प्रमुख कोरोनाबद्दल इतके अनभिज्ञ कसे ? असा प्रश्न लोकांना पडला आहे.


1 comment

Unknown said...

निर्ढावलेले अधिकारी