Header Ads

मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, गुन्हा दाखल


मुरुम: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी रोडवर उमाकांत हनमंत शिंदे रा. किसान चौक, मुरुम यांनी दि. 25.03.2020 रोजी 09.30 वा. सु. मुरुम मोड येथे ट्रक क्र. एम.एच. 02 एफजी 1038 मध्ये प्रवाशी वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास गस्ती दरम्यान आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम क्र. 11 अन्वये गुन्हा दि. 25.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मनाई आदेश झुगारुन दुकाने इत्यादी चालू ठेवणाऱ्यांविरुध्द, 4 गुन्हे दाखल 

उस्मानाबाद -  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने इत्यादी बंद ठेवण्याचा शासन आदेश झाला असतांनाही दि. 25.03.2020 रोजी 1)संकेत रमेशचंद्र गरग 2)रमेशचंद्र सेवाराम गरग 3)टिंकु रमेशचंद्र गरग 4)सुनिल गरग सर्व रा. तुळजापूर यांनी दि. 25.03.2020 रोजी मध्यरात्री पर्यंत तुळजापूर येथे दुकान चालू ठेवले तर उमाकांत दगडु सुर्यवंशी रा. बलसुर, ता.उमरगा यांनी दि. 25.03.2020 रोजी बलसुर येथे पानटपरी चालू ठेवली तर 1) देविदास तानाजी बिराजदार 2) अविनाश बाळासाहेब चव्हाण दोघे रा.गुगळगाव, ता.उमरगा हे दि. 25.03.2020 रोजी मौजे गुगळगाव येथे तर 3)राजकुमार रामहारी माने रा. इंदीरानगर, परंडा हा दि. 26.03.2020 रोजी परंडा येथे तोंडाला मास्क न लावता निष्काळजीपणे, अन्य नागरीकांच्या आरोग्याची काळजी नकरता सार्वजनिक ठिकाणी फिरत होते. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments