Header Ads

ग्राहकांची गर्दी फळे-पालेभाज्या विक्रेत्यांवर, गुन्हे दाखलपोलीस ठाणे, आनंदनगर: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन 1)योगेश लक्षमण थोरात 2)रहीस शहाबुद्दीन बागवान 3)विशाल संभाजी चांदणे 4)अमीत महादेव चव्हाण 5)दिपक विष्णु पारशी सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि. 30.03.2020 रोजी 10.00 ते 11.00 वा. चे दरम्यान उस्मानाबाद येथील बसस्थानक समोर आपापल्या ताब्यातील फळगाड्यावर नाका- तोंडास मास्क न लावता, गाड्यावर आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे न करता त्यांची गाड्याभोवती गर्दी करु देवून फळ विक्री करत असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळून आले. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे सरकार तर्फे फिर्यादीवरुन वरील फळविक्रेत्यांविरुध्द भा.द.वि. कलम- 188 अन्वये 5 स्वतंत्र गुन्हे दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 12 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे असतांनाही दि. 30.03.2020 रोजी 1)अजय बंडु राठोड रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद 2)अमेश बन्शी पवार 3)संजय एकनाथ देवकते 4)शशिकांत विष्णुकांत तांदळे 5)बालाजी सोमनाथ कुसळकर 6)नंदु गौतम सोनवणे 7)ताजोद्दीन शमशेद्दीन सय्यद 8)मुनीर सैलानी चाचा 9)अजय बाबुराव भगत सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व उस्मानाबाद शहरात तर, 10)संतोष नागनाथ गायकवाड रा.धोत्री, ता.तुळजापूर हा मौजे धोत्री येथे तर, 11)सचिन बाळासाहेब पाटील रा.तुळजापूर हा तामलवाडी येथे तर, 12)जमीर शेख, समीर शेख, हसन शेख, अरबाज शेख चौघे रा. मसोबाचीवाडी, ता.वाशी हे मसोबाचीवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असतांना संबंधीत पो.ठा. च्या पोलीस पथकास गस्तीदरम्यान आढळुन आले. यावरुन वरील व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 12 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, शिराढोण: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन विलास बाबुराव सिरसट रा.खामसवाडी, ता.कळंब हे दि. 30.03.2020 रोजी 09.00 वा. सु. सांगली येथील मजुरांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 5067 ला जोडलेल्या ट्रॉली मध्ये अवैधरित्या खामसवाडी येथे वाहुन आनत असतांना पो.ठा. शिराढोण यांच्या पथकास आढळले. यावरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271 अन्वये गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी
पोलीस ठाणे, आनंदनगर: सालीया ईरशाद शेख रा. मिली कॉलनी, उस्मानाबाद या दि. 25.03.2020 रोजी 21.00 वा. सु. घर उघडे ठेउन शेजारी गेल्या असता अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरामध्ये असलेल्या कपाटातील 18 ग्रॅम वजनाचे सोने- चांदीचे दागिने एकत्रीत किं.अं. 56,000/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सालीया शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: उमेश सतीश शिराळकर रा. वडगांव, ता.उस्मानाबाद हे दि. 29.03.2020 रोजी 00.55 वा. सु. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरात सुरक्षा रक्षक म्हणुन 36 क्रमांक आरती पॉईंट येथे कर्तव्यावर असतांना त्यांनी दानपेटीमधील 1,160/- रु. चोरी केल्याचे आढळुन आले. अशा मजकुराच्या शाहुराज शेषेराव माने पर्यवेक्षक, तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतावर गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments