Header Ads

Coronavirus Updates : इटलीहून आज २६२ लोक भारतात येणार


नवी दिल्ली - देशात कोरोनाचा विळखा वाढत असताना, आज 262 जण इटलीहून परत येणार आहे,  त्यातील बहुतेक विद्यार्थी आहेत. त्यामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे, या सर्वाना कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव  अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून देशभरातील 111 प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात येणार आहे.  भारतीय आणि इतर देशांतील 1600 लोकांना कॉरंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. आज 262 लोक रोम, इटलीहून परत येतील आणि त्यांना कॉरंटाईन सेंटर ठेवले जाईल. त्यातील बहुतेक विद्यार्थी आहेत.

भारत सरकारच्या वेबसाइट covidout.in  च्या वृत्तानुसार, शनिवार, २१ मार्च, २०२० रोजी संध्याकाळी  साडेपाच पर्यंत देशात कोरोना विषाणूची (COVID-19) एकूण २९९ रुग्णांची नोंद झाली आहे. 269 ​​लोक अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. 23 लोक सावरले आहेत. त्याचवेळी, चार लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. येथे कोरोना विषाणूची लागण 64 जणांना झाली आहे. तिथेही एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

No comments