कोरोना रुग्ण एकदा बरा झाला तरी पुन्हा संसर्ग होऊ शकतो

 
कोरोना विषाणू बनला जगभर चिंतेचा विषय 

कोरोना रुग्ण एकदा बरा झाला तरी पुन्हा संसर्ग होऊ शकतो


नवी दिल्ली  -  इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारत देशामध्ये कोरोना विषाणूची लागण ज्या तीव्रतेने होत आहे त्याचे प्रमाण तुलनेने नियंत्रित केले जाऊ शकते. रविवारीच दुपारपर्यंत देशात कोरोना असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजारच्या पार झाली होती. आतापर्यंतच्या नवीन आकडेवारीत काही रूग्ण या कोरोनाच्या आजारातून बरे झाल्याचे दर्शवित आहेत तरीही दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच दिसत आहे. तर दुसरीकडे डब्ल्यूएचओसह इतर तज्ञ देखील लोकांमधील संक्रमण पूर्णपणे बरे होण्यास नकार दर्शवतायत. तथापिडब्ल्यूएचओने कोविड19 म्हणजेच कोरोना झालेले बहुतेक संक्रमित लोक बरे होण्याची शक्यता वर्तविली असून कोरोनाचा परिणाम कमी होईल असेही म्हटलेले आहे.


पुन्हा संसर्ग होण्याचा धोका
यूएस-आधारित रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यांनी आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार असे सूचित केले गेले आहे की कोविड- 19 च्या विरोधात लढण्यास मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीबद्दल कोणतेही मत नाही. इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार मार्सकोव्ह संसर्गाच्या रूग्णांच्या बाबतीत असे आढळून आले की एकदा रुग्ण रोगमुक्त झाला की आजारी पडण्याची शक्यता नव्हतीपरंतु आता कोविड -19 च्या बाबतीत अशी प्रतिकारशक्ती विकसित होते की नाही हे अजून स्पष्ट नाही. तर कदाचित मानवाला पुन्हा कोरोना होऊ शकतो.

शरीर संरक्षण करते

चीनच्या बीजिंग येथील चिनी फ्रेंडशिप हॉस्पिटलच्या न्यूमोनिया प्रतिबंध आणि उपचार विभागाचे संचालक ली किंगयुआन यांना चीनमध्ये कोविड-19 पॉझिटिव्हच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये असे आढळले की, संक्रमित व्यक्तींच्या   शरीरा ने  कोविड- 19 विरूद्ध लढण्यास एं टीबॉडी  विकसित  केल्येत, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हे संरक्षण किती काळ राहते याची पुष्टी मिळालेली नाही. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये जसे की आजारी व्यक्ती आणि इतर कारणांमुळे ते क्षणिक प्रभावी होते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये जसे की आजारी व्यक्ती आणि इतर कारणांमुळे ते क्षणिकच प्रभावी होत असेल.

कोव्हिड 19 स्वतःचे स्वरूप बदलू शकतो

ह्यूस्टनमधील टेक्सास युनिव्हर्सिटीच्या पेडियाट्रिक (बालरोगतज्ञ) मेडिकल स्कूलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पीटर जंग यांचा असा विश्वास आहे की, फ्लूच्या संसर्गामुळे विषाणूचे लक्षण आणि स्वरूप बदलतात अगदी तसेच कोविड -19  विषाणू हे स्वतःमध्ये बदल आणू शकतात.अशा परिस्थितीत विषाणूचे बदलते स्वरूप शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करू शकते आणि संवेदनाक्षम बनवतेज्यामुळे आजार होण्याचा धोका अधिक काळ वाढू शकतो.
पेन ग्लोबल मेडिसिनचे वैद्यकीय संचालक स्टीफन ग्लूकमन यांच्या म्हणण्यानुसार कुठलाही आजार झाल्यावर बहुतेक लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढत असते. तथापिकोरोनाच्या बाबतीत ही परिस्थिती उलट आहेजी अद्याप स्पष्ट झालेली नाही. कोरोना विषाणू नवीन नाही. कोरोना बराच काळ अनेक प्रजातींच्या आसपास होता. म्हणूनचकोरोना विषाणूचे स्वरुप आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय सर्व काही पुरेसे झाल्यानंतरही कोरोना आजार पूर्ण बरा होत नाहीत. तथापिकोरोनाच्या बदलत्या स्वरूपाच्या बाबतीत कुणाचेच एकमत नाही.

From around the web