कोरोना संशयित तरुणाची रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्महत्या

 
 कोरोना संशयित तरुणाची रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्महत्या
नवी दिल्ली - सिडनी येथून भारतात आलेल्या पंजाबच्या एका तरुणाने रुग्णालयाच्या इमारतीवरुन घेतली उडी घेऊन स्वतःचा आयुष्य संपवलं. भारतात आल्यानंतर येथील अधिकाऱ्यानी त्यास कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात पाठवलं होतं.

 चरणजित सिंग असं या तरूणाचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. चरणजित बुधवारी सिडनीहून एअर इंडियाच्या विमानातून परत आला होता, त्यानंतर विमानतळावर कोरोना संशयास्पद आढळल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठविण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9 वाजता चरणजितला सफदरजंग रुग्णालयात नेल गेलं. तो मूळचा पंजाबचा असून गेल्या एक वर्षापासून सिडनी इथे राहत होता. त्याला कोरोना झाल्याचा संशय आल्याने थेट विमानतळावरून सफदरजंग इथे पाठविण्यात आलं. पण या सगळ्याचा चरणजित मानसिक त्रास झाला असावा की काय म्हणून त्याने रुग्णालयाच्या इमारतीवरूनच उडी घेत आत्महत्या केली. त्याच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून नागरिकांची भीती आणखी वाढली आहे.


विशेष म्हणजे, देशात कोरोनामुळे त्रस्त तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हे मृत्यू दिल्ली, कर्नाटक आणि मुंबई येथे झाले. हे सर्व पीडित वृद्ध होते. त्याच वेळी, देशातील कोरोनामुळे 160 हून अधिक लोक त्रस्त असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर, जगभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनामुळे 8 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखाहून अधिक लोक या विषाणूच्या चपळ्यात आहेत.

जगभरात कोरोनामुळे ८ हजार लोकांचा मृत्यू 

कोरोनामुळं जगभरात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला आहे. वर्ल्ड मीटर्सच्या आकेडावारीनुसार काल दुपारपर्यंत 2 लाख 4 हजार 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 8 हजार 246 च्या घरात पोहोचली आहे. भारताला चिंतेत टाकणारी बाब म्हणजे परदेशात असणाऱ्या एकूण 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार आहेत. रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून काही संदेश देण्याची, तसेच एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

From around the web