घाबरू नका : तो व्यक्ती ठणठणीत !

उस्मानाबाद -  समुद्रवाणीचा तो व्यक्ती  ठणठणीत आहे, त्याला  काहीही  झाले नाही, मात्र गावकऱ्यांनी भीतीपोटी त्यास बळजबरीने रुग्णालयात पाठवल्याचे समोर आले आहे. मात्र यानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा उघडी पडली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील ५५  वर्षाचा एक व्यक्ती पुण्यातील एका नातेवाईकडे गेला होता, गावी परत आल्यानंतर कोरोनाच्या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात  बळजबरीने दाखल केले होते, त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने या व्यक्तीला  अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.

उस्मानाबाद लाइव्हने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या बेफिकीर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आणि त्या संशयित रुग्णास त्या वार्डमध्ये ऍडमिट करून घेण्यात आले.


मात्र तपासणी मध्ये तो व्यक्ती ठणठणीत असून, त्यास कसलाही आजार झालेला नाही, गावकऱ्यांनी बळजबरीने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

यानिमित्त आरोग्य यंत्रणा उघडी पडली असून, त्याचे खापर जिल्हा शल्य चिकित्सक उस्मानाबाद लाइव्हच्या स्थानिक बातमीदारावर फोडत  आहे.

4 comments

Unknown said...

१)लोकांनी अगोदर शहानिशा करायला हवी होती ,तो माणूस खरच कोरोना बाधीत आहे का ,
२) डाँक्टरानी पण कोणताही विचार न करता त्या माणसाला सिव्हिल हाँस्पिटल मध्ये न्यायलख नको होते.

३) जरी नेले तरी सिव्हिल हाँस्पिटल मधील डाँक्टरांनी लगेच कार्यवाही करायला हवी होती.

४) सगळीकडे काळजी घेतली जाते मग या ठिकाणी हलगर्जीपणा करायला नको होता.

५) परमेश्वराचे आभार तो माणूस ठणठणीत आहे.

६) परमेश्वरा सगळयांना सुखी ठेव. आणि या जीवघेण्या व्हायरसपासून लवकर सूटका कर.

Unknown said...

प्रशासनाची किती सतर्क आहे हे दिसून आले सर्वांचे आभार

Unknown said...

Osmanabad madhe nahi yeu shakat corona 😎😎😎
Take care bhailog

Unknown said...

Osmanabad madhe nahi yeu shakat corona 😎😎😎
Take care bhailog