वाघोली गावात पुणे, मुंबईच्या व्यक्तीस नो एंट्री

प्रमुख रस्त्यावर लावले बांबू आणि काटेरी झुडपे 


उस्मानाबाद - जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाच चांगलाच धसका घेतला आहे. तालुक्यातील वाघोली गावात पुणे, मुंबईसह इतर गावातून येणाऱ्या लोकांसाठी नो एंट्री  करण्यात आली आहे. यासाठी ग्रामस्थानी नामी शक्कल लढवली आहे. गावात येणाऱ्या सर्व रस्त्यावर बांबू लावून बाभळीचे काटेरी झुडपे लावण्यात आले आहेत. 

कोरोना मुळे जगभर हाहाकार उडालेला आहे. इटलीत दररोज शेकडो माणसे मरत आहेत. देशात आतापर्यंत जवळपास ५००  रुग्ण आढळले आहेत, पैकी ८ मृत झाले आहेत. राज्यात १०१ संख्या गेली आहे. पैकी तीन जण मरण पावले आहेत. 


 कोरोनाच्या भीतीने उस्मानाबाद जिल्ह्याचीही सीमा बंद करण्यात आली आहे. सुरुवातीला शहरी भागात कोरोनाची भीती अधिक होती. आता याची झळ ग्रामीण भागातील लोकांना देखील बसू लागली आहे. त्यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यातील काही अंतरावरच असलेल्या वाघोली या गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ बांबू आणि काटेरी  झुडपे लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी तपासणी करून येण्यास सांगितले जात आहे.

वाघोली गाव  जवळपास ५ हजार लोकवस्तीचे असून गावातील दुकाने फक्त एका ठराविक वेळेत उघडण्यात येणार आहेत, महाराष्ट्र लॉकडाऊन असताना वाघोली ग्रामस्थांनी बाहेरील लोकांना नो एंट्री करून कोरोनापासून स्वतःचा बचाव केला आहे,

 वाघोली गावात  नागरिकांना सहजासहजी प्रवेश मिळू शकत नाही. वाघोली गावामध्ये जाण्यासाठी हा एकच रस्ता असून गावात जाताना आपले नाव नोंदवून घेण्यास बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तींना विचारूनच आत प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे एखादा संशयित रुग्ण सहजासहजी गावात जाऊ शकत नाही

Video

No comments