Header Ads

मनाई आदेश झुगारुन दुकाने चालू ठेवणाऱ्यां व गोंधळ घालणाऱ्यांविरुध्द, 16 गुन्हे दाखल


उस्मानाबाद -  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी, हॉटेल, दुकाने, बेकरी इत्यादी बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश झाला आहे. असे असतांनाही मोहन परमानंद मेहता, अतुल राम वडतिले, निवृत्ती सोपान काळे, तीघे रा. वाशी, नाजिर गैबी मुलाणी, ज्ञानेश्वर विश्वनाथ मोरे, नेताजी शिवाजी चौधरी तीघे रा. तुळजापूर, युसुफ महमaद शेख रा. नळदुर्ग, मुरलीधर चौथमल चांडक, संजय अभिमन्यु घोगरे दोघे रा. उस्मानाबाद, बळीराम अनंत क्षिरसागर, रा. येडशी, ता. उस्मानाबाद या सर्वांनी आपापल्या गावी दि. 23.03.2020 रोजी हा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या, दुकाने, हॉटेल इत्यादी चालू ठेउन विक्री करुन लोकांची गर्दी निर्माण केली.

तर सी.आर.पी.सी. कलम- 144 अन्वये जमावबंदी आदेश अंमलात असतांनाही शहाबाज शेख, भारत शिंदे, धिरज भांगे, सुलेमान इनामदार, अशोक बांगर, अजय शिंदे, अविनाशकुमार सिंग, यांनी सर्व येरमाळा येथे तर अशोक कात्रे, देवानंद गायकवाड दोघे रा. मसोबाची वाडी, आकाश दरवडे, बालाजी मोरे, ज्ञानेश्वर कवडे तीघे रा. वाशी यांनी तेरखेडा येथे तर इरफान कुरेशी, इमरान कुरेशी, शाहबाज सौदागर तीघे रा. उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद येथे तर परमेश्वर माने, ज्ञानेश्वर शिंदे, उमेश काळदाते, शिवराज बचाटे, दत्ता मस्के रा. काक्रंबा, जनार्धन माने, आकाश माने, प्रमोद भोरे, वैजीनाथ पवार, आदर्श घाटशिळे, ओंकार हुंडकरी, स्वप्नील मोरे सर्व रा. तुळजापूर यांनी तुळजापूर येथे दोन वेगळया ठिकाणी तर लिंबराज टेकाळे, धनराज इंगोले, सुमेश डिकले, आकाश माळी, अक्षय वडे, आकाश गुंठाळ, सुभंकर जोशी, आदित्य काटे, आकाश करवा, सुरज करडे सर्व रा. कळंब यांनी कळंब येथे आरडा-ओरड करुन गोंधळ घालत असतांना पोलीस पथकास आढळुन आले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, सह म.पो.का. कलम- 135, 110/117 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 16 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 23.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments