जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी आखला 'गोल' !

 
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी आखला 'गोल' !

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही घराच्या बाहेर पडू नये म्हणून निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र जीवनावश्यक गरजा असणारी दुकाने सुरु राहणार आहेत, त्यात मेडिकल, किराणा, दूध, भाजीपाला यांची दुकाने उघडी राहणार आहेत. 

अश्या दुकानात  लोकांनी गर्दी करू नये म्हणून उस्मानाबादच्या पोलिसांनी शहरात काही नियम आखून दिले आहेत. दुकानासमोर एक मीटर अंतर सोडून खडू आणि मार्करने एक गोल आखण्यात आला असून, लोकांनी त्याच गोलमध्ये उभे राहून पुढे  जायचे आहे. अश्या दुकानासमोर काही पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. लोकांना शिस्त लागेपर्यंत पोलीस दुकानासमोर उभे राहणार आहेत. 

लोकांनी या  नियमाचे पालन करावे, कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  लोकांनी अस्वस्थ न होता, काही समस्या आणि अडचणी असल्यास किंवा कुठे गोंधळ, गडबड होत असल्यास  उस्मानाबाद पोलीस नियंत्रण कक्ष ( ०२४७२ -२२२७००) संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 


From around the web