Header Ads

कोरोना : परदेशातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेले १९ जण निगेटिव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना  एकही पॉजिटीव्ह रुग्ण नाही. परदेशातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे, त्यामुळे उस्मानाबादकरानी तूर्तास  समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अमेरिका, दुबई, इटली अश्या देशातून १९ नागरिक आले होते. त्यातील काहींनी स्वतः हून शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी केली होती तर काही जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून तपासणी करायला लावली होती. त्यांचे घश्याचे स्त्राव चाचणीसाठी एन आय व्हि पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर काल २२ मार्च रोजी त्यांचा चाचणी अहवाल जिल्हा रूग्णालयाला  प्राप्त झाले आहेत.

सध्या त्या १९ जणांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

वाशी -१, लोहारा-४, उमरगा - ९, तुळजापूर -२, उस्मानाबाद -२, मुरूम - १ अशी तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या आहे.

No comments