Header Ads

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 4 गुन्हे दाखलउस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे असतांनाही 1)अकबर सरताज शेख रा. उस्मानाबाद 2)सागर तानाजी साळुंखे रा. जिजय चौक, उस्मानाबाद 3)सौरभ तानाजी निंबाळकर रा. उस्मानाबाद हे तीघे उस्मानाबाद येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी तर, 4)अतुल विजयकुमार गाढवे रा.काटेगाव, ता.बार्शी हे ढेकरी येथील चेक पॉईंटवर दि. 29.03.2020 रोजी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असतांना संबंधीत पो.ठा. च्या पोलीस पथकास गस्तीदरम्यान आढळुन आले. अशा प्रकारे वरील व्यक्तींनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये वरील व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments