Header Ads

कोरोना :  आ. कैलास पाटील यांची आमदार निधीतून ५० लाखाची मदत 


उस्मानाबाद -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपण  एक महिन्याचे वेतन देऊ केले आहेच पण आता जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्वांना आमदार निधीतील पन्नास लाख रुपयाची तरतुद या कामासाठी केलेली आहे, असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

 जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर्स,नर्सेस इतर आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा लाखाचा निधी दिला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीआयपीएपी मशिन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असुन त्याची तरतुद करण्यात आली आहे.

उस्मानाबाद- कळंब मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी इफ्रारेड थर्मामीटरर्सची सोय करण्यात येणार आहे. त्याच्या खरेदीसाठी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. शिवाय या सर्व केंद्रावरील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यासाठी तीन लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील सर्व कोरोना सहाय्यता कक्षाच्या माध्यमातुन सॅनिटाझर व मास्क वितरीत करण्यासाठी सात लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. असा एकुण पन्नास लाखाच्या निधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, त्याप्रमाणे हा खर्च करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेले आहे,असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाची यंत्रणा सज्ज आहे. राज्यावर सध्या आणीबाणीची परिस्थिती असुन मोठ्या आर्थिक मदतीची गरज भासत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेशटोपे यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने परिस्थिती हातळत आहेत. पण अशा अभुतपुर्व परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व ओळखुन मदतीचा हात देण्याची गरज आहे, असेही आमदार पाटील म्हणाले. 

No comments