Header Ads

मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, 4 गुन्हे दाखलपोलीस ठाणे, कळंब: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन माधव किसन केंद्रे रा. अहमदपुर, जि.लातुर यांनी दि. 28.03.2020 रोजी 09.54 वा. सु. कळंब, बसस्थानक समोर कळंब ते परळी ट्रक क्र. एम.एच. 12 एचडी 3456 मध्ये टपावर, कॅबिन मध्ये 115 प्रवाशी घेउन अवैधरित्या वाहतुक करत असतांना पो.ठा. कळंब चे सपोनि श्री. अशोक पवार यांच्या पथकास गस्ती दरम्यान आढळुन आले. तर- 1)सुनिल बाळु गुजर रा. सावर्डी (बु.) जि.कोल्हापुर 2)वाहीद बशीर नालबंद रा. राजारामपुरी, कोल्हापूर हे दोघे दि. 29.03.2020 रोजी  मांजरा नदीचे चेक पोस्ट येथे कळंब ते परळी पिकअप क्र. एम.एच. 25 सी 6486 मध्ये 23 प्रवाशी घेउन अवैधरित्या वाहतुक करत असतांना पो.ठा. कळंब येथील पोहेकॉ- दिलीप धावडे यांना आढळुन आले. यावरुन वरील दोन्ही वाहन चालकांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम- 11, सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कलम- 2, 3, 4 सह, म.पो.का. कलम- 135 सह, मो.वा.का. कलम- 66/192 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, उमरगा: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन 1)अब्दुल जैनोद्दीन शेख रा. बेलापूर, ठाणे 2)आरिफ मसुदआलम शेख रा.मुंबई 3)मुजफर महंमद जमील मुसरफ रा. उबळी, जि. धारवाड, कर्नाटक हे  ट्रकमध्ये तर 1)लोकेश विठ्ठलराव मैत्रीकर रा.ईटगा, ता.हुमनाबाद 2)शाहनुर शमशोद्दीन अतनुर रा.नवी मुंबई 3)बसवराज विरशेट्टी आणदुर रा.बगदल, ता.बिदर, कर्नाटक हे दि. 28.03.2020 रोजी 17.30 वा. सु. कसगी बॉर्डर, उमरगा येथून मुंबई ते तेलंगणा त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये अवैध प्रवाशी वाहतुक करत असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील वाहन चालकांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम- 11 सह, मो.वा.का. कलम- 66/192 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments